Friday, 10 July 2015
शालेय परीपाठ
दिनांक - 11जुलै 2015
तिथी - अधिक आषाढ कृ. 10 शके 1937
वार - शनिवार
प्रार्थना
मी मातीचा गोळा, तू दिला आकार.काढून विकार,गुरुराया !
ज्ञानामृत देई,गुरु माझे आई.चुका पोटी घेई, लेकराच्या !
गुरु दूर करी,अज्ञान अंधार.प्रकाष होवून,ज्ञानियाचा !
संसार नश्वर,स्वार्थाची ती बेडी.मोह पाश तोडी,गुरु माझा !
गुरु हाच ध्यास,गुरु माझा श्वास.जगाचा विश्वास, गुरु माझा !
दिनविशेष
ग्रेगरियन वर्ष 2015 मधील 192 वा दिवस,
वार - शनिवार, दिनांक-11जुलै 2015,
तिथी- अधिक आषाढ कृ. 10 शके 1937,
नक्षत्र- भरणी,
योग-शूल,
करण-बव,
सूर्योदय- 6.10 मी.
सूर्यास्त – 19.18 मी.
जागतिक दिवस
जागतिक लोकसंख्या दिन : संयुक्त राष्ट्रे.
नाडम : मंगोलिया.
राष्ट्रीय समुद्री दिन : चीन
ठळक घटना/महत्वपूर्ण घडामोडी
१३४६ : लक्झेम्बर्गचा चार्ल्स पाचवा पवित्र रोमन सम्राटपदी.
१८५९ : चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.
१८८९ : मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.
१९२१ : मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य.
१९४० : हेन्री फिलिप पेटैं विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
१९५७ : करीम हुसेनी आगाखान इस्माइलीपंथाच्या प्रमुखपदी.
१९७१ : चिलीने तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले.
१९७९ : अमेरिकेचे अंतराळस्थानक स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.
२००३ : १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस पुनः सुरू
जन्म/वाढदिवस/जयंती
१२७४ : रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.
१६५७ : फ्रेडरिक पहिला, प्रशियाचा राजा.
१७६७ : जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
१८८९ : नारायन हरी आपटे यांचा जन्मदिन.
१९१६ : गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.
१९५० : जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
४७२ : अँथेमियस, पश्चिम रोमन सम्राट.
११७४ : अमाल्रिक, जेरुसलेमचा राजा.
१६८८ : मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन.
१६८८ : नराई, सयामचा राजा.
१८०४ : अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.
१९८९ : सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता.
सुविचार
खंबीर मन व बलशाली मणगट हेच सामर्थ्य
म्हणी
उंटावरून शेळ्या हाकणे - आळस, हलगर्जीपणा करणे
कथाकथन -
प्रतापगडचा राजा विरभद्रला एके दिवशी सेनापतीने सूचना दिली,''महाराज, काल रात्री आपल्या महालात
आपल्या सैनिकाची हत्या झाली आणि त्याच्या मृतदेहाजवळ हे पत्र मिळाले आहे'' राजाने ते पत्र वाचले, त्यात राजाला
धमकी देण्यात आली होती की,'लवकरच प्रतापगडचे सिंहासन खाली केल नाही तर रोज एक सैनिक मारला जाईल' राजाने
खुन्याचा शोध घेण्याचा आदेश दिला, या दरम्यान वीरभद्रचा मुलगा बलभद्र हा शिक्षण पूर्ण करून राज्यात परत आला
होता. राजकुमार बलभद्रने महालाच्या सुरक्षेच्या कारभार स्वत:कडे घेतला होता. त्याने सैनिकांना आज्ञा केली चार-चार
सैनिकांची तुकडी बनवून पहारा द्या. योगायोगाने त्या रात्री कोणत्याही सैनिकाची हत्या झाली नाही. तेव्हा राजकुमाराने
सेनापतीला म्हटले,'' असे वाटते की हत्या करणारा घाबरला आहे. आता ही सुरक्षा व्यवस्था काढुन घ्यावी.'' सेनापतीने
विरोध केला. परंतु राजकुमाराने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी राजमहालाच्या बाहेर एक सैनिक तैनात करण्यास
सांगितले. खुनी त्याला मारण्यासाठी गेला. त्याने सैनिकावर वार केला. परंतु लपुन बसलेल्या राजकुमाराने त्याला पकडले.
तो खुनी सेनापती निघाला. त्याने कबुल केले की की शेजारील राज्याच्या राजाने त्याला प्रतापगड जिंकल्यावर अर्ध्या
राजाचा राजा बनविण्याचे आमिष दाखविले होते. राजाने सेनापतीला कैद करून देहदंडाची शिक्षा दिली.
तात्पर्य :- अति लोभापायी विश्वासपात्र लोकही दगा देतात.
सा. ज्ञान
भारताचे ध्येय – सत्यमेव जयते,
राष्ट्रगीत – जन-गण-मन
समुहगीत
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा,हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात.ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर, कधी मागायास दान,स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही,हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन,स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान